विदर्भ राज्य व आंतर जिल्हा कॅरम स्पर्धेचे उद्घाटन
By Admin | Updated: August 28, 2014 23:54 IST2014-08-28T23:53:04+5:302014-08-28T23:54:32+5:30
पियू उकेची विजयी सलामी

विदर्भ राज्य व आंतर जिल्हा कॅरम स्पर्धेचे उद्घाटन
अकोला: विदर्भ कॅरम असोसिएशन सभागृहात आजपासून सुरू झालेल्या विदर्भ राज्य व आंतर जिल्हा कॅरम स्पर्धेला पियू उके याने विजयी सलामी दिली. कॅडेट बॉईज गटात प्रथम फेरीमध्ये पियू उके व तेजस बचे यांच्यात पहिली लढत झाली. यामध्ये पियूने २५-१, २५-0 असा एकतर्फी विजय मिळविला.
ऋषिकेश मोरे व रुद्र देशमुखमध्ये झालेल्या लढतीत २५-0, २५-३ ने ऋषिकेशने विजय मिळविला. यश दुबे याने लौकिक उजवणे याच्यावर २५-0, २५-३ असा विजय मिळविला. साईकृष्णा दहीकर याने युवराज बोरकुटेवर २५-0, २५-५ गुणाने मात केली. कॅडेट गटातील सर्व लढती एकतर्फी झाल्या.
सब ज्युनिअर मुलींमध्ये अमिता ठोसरे, अबोली पाटील, नयना यादव, पूजा लाडखेडकर मुलांमध्ये आयुष राठी, नीलाक्ष चव्हाण, दीपक पाटील यांनी विजय मिळविला. ज्युनिअर बॉईज एकेरीमधील दुसर्या फेरीत ज्ञानेश्वर केदार, शेख नदीम, रूपेश दहीकर, प्रदीप राठौड, सुमित परदेशी, यश दामोदर, फैजल बुधवानी, राधेश्याम पटेकर. ज्युनिअर गर्ल्स गटात प्रथमफेरीत पूनम किसकर, नेहा यादव, मेघा बंग, चंदा शास्त्री यांनी विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला.
तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष संदीप पुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अकोला डिस्ट्रीक्ट अँटोमोबाईल्स डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत राठी यांची प्रमुख उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय कॅरम पंच जे.व्ही. संगम यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या स्पर्धेत १५0 च्या वर स्पर्धक सहभागी झाले आहेत. सिमको या मान्यताप्राप्त कॅरम बोर्डवर सामने खेळण्यात येत असून, स्पर्धेतील विजेते राष्ट्रीय स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधित्व करतील, असे कॅरम फेडरेशनचे सरचिटणीस प्रभजितसिंह बछेर यांनी सांगितले. स्पध्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे.