अकोल्यात राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन
By Admin | Updated: January 28, 2017 12:31 IST2017-01-28T12:31:31+5:302017-01-28T12:31:31+5:30
चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ झाला आहे. यंदाचे हे संमेलन देशासाठी बलिदान देणा-या शहिदांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले आहे.

अकोल्यात राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 28 - चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाला आजपासून (28 जानेवारी) प्रारंभ झाला आहे. यंदाचे हे संमेलन देशासाठी बलिदान देणा-या शहिदांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले आहे. सकाळी निघालेल्या ग्रंथदिंडीचे संमेलन स्थळी आगमन होताच संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते क्रांती ज्योत प्रज्वलित करुन संमेलनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समग्र साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने गत चार वर्षांपासून अकोला येथे राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. येथील स्वराज्य भवनाच्या प्रांगणात संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्यासह आचार्य हरिभाऊ वेरूळकर, प्रकाश महाराज वाघ, हभप आमले महाराज आदींच्या उपस्थितीत क्रांती ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
संमेलनासाठी सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट, अॅड. संतोष भोरे, डॉ. प्रकाश मानकर, गोपाल गाडगे, ज्ञानेश्वर साकरकर, डॉ. राजीव बोरकर, श्रीपाद खेडकर, अभिजित राहुरकर व डॉ. रामेश्वर लोथे आदीं परिश्रम घेत आहेत.