इंदिरानगर येथे ग्रंथालयाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:47 IST2021-01-13T04:47:02+5:302021-01-13T04:47:02+5:30

तेल्हारा : राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त इंदिरानगरात १२ जानेवारी राेजी स्व. अमृतराव मारोती गायकवाड सार्वजनिक वाचनालयाचे ...

Inauguration of Library at Indiranagar | इंदिरानगर येथे ग्रंथालयाचे उद्घाटन

इंदिरानगर येथे ग्रंथालयाचे उद्घाटन

तेल्हारा : राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त इंदिरानगरात १२ जानेवारी राेजी

स्व. अमृतराव मारोती गायकवाड सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी भारत मातेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, या उद्देशाने ग्रंथालयाची स्थापना केली. ग्रंथालयात पुस्तके उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण सभापती आरती गायकवाड यांनी केले.

यावेळी राहुल श्रुंगारकर, तहसीलच्या अन्नपुरवठा विभागातील रुहीना निसार अली यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी माजी सैनिक राम पाऊलझगडे, रामेश्वर घंगाळ, अतुल वानखडे यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष त्र्यंबक भटकर, ज्येष्ठ नागरिक शंकरराव वाघमोडे, वासुदेव गावत्रे, गजानन माझोडकार, नितीन ढोके, गजानन चाफे, प्रमोद गावंडे, अशोक गव्हाळे, शिवहरी खेट्टे, श्रीकृष्ण खोडे, रवी राजगुरे, समीर निसार अली यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन गायकवाड यांनी केले. कार्यक्रमासाठी एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Inauguration of Library at Indiranagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.