अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल ९ उमेदवारांचा थोड्या मतांनी गुलाल हुकला. अनेक प्रभागांमध्ये 'नोटा' हा पराभवाचा निर्णायक घटक ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले. विविध पक्षाच्या दिग्गज उमेदवारांना नोटा मतांनी फटका बसला.
काँग्रेसचे उमेदवार व माजी नगरसेवक मोहम्मद इरफान हे अवघ्या १७ मतांनी पराभूत झाले. त्यांच्या प्रभाग क्रमांक ७ मध्ये नोटाला १५१ मते मिळाली. उद्धवसेनेच्या निकिता आकाश कवडे यांचा ४५ मतांनी पराभव झाला; येथे २४३ मते नोटाला पडली.
भाजपच्या रंजना विंचनकर यांचा ३०२ मतांनी पराभव झाला असून, त्यांच्या प्रभागात २१३ मते नोटाला मिळाली. राष्ट्रवादी (अजित पवार) चे नकीर खान हे ४२७मतांनी पराभूत झाले; त्यांच्या प्रभागात ३९५ मते नोटाला पडली. त्याच पक्षाच्या कविता देशमुख या ४२८ मतांनी पराभूत झाल्या असून, येथे ४३१ मते नोटाला मिळाली.
भाजप, उद्धवसेनेचे तीन, काँग्रेस एक, राष्ट्रवादी (अजित पवार) दोन जागांचे नुकसान झाले आहे. थोड्या फार मतांनी भाजप आणि उद्धवसेनेचे तीन उमेदवार पराभूत झाल्याने, तीन जागांवर नुकसान सहन करावे लागले. काँग्रेसला एक तर राष्ट्रवादी (अजित पवार) ला दोन जागांवर नोटामुळे फटका बसल्याचे दिसून आले.
गणित बिघडले
भाजपचे दिलीप मिश्रा हे २४९ मतांनी पराभूत झाले; त्या प्रभागात ५४८ मते नोटाला मिळाली. भाजपच्याच मुस्कान पंजवानी यांना ४६२ मतांनी पराभव स्वीकारावा लागला; येथे तब्बल ७१३ मते नोटाला पडली. उद्धवसेनेच्या वर्षा घोगरे यांचा २३६ मतांनी पराभव झाला असून, ३६२ मते नोटाला मिळाली. तसेच, शंकर लंगोटे यांचाही पराभव झाला.
Web Summary : NOTA proved decisive in Akola, costing nine candidates victory. Congress, Shiv Sena (UBT), BJP, and NCP (Ajit Pawar) candidates suffered narrow defeats due to NOTA votes.
Web Summary : अकोला में नोटा निर्णायक साबित हुआ, नौ उम्मीदवारों को हार का सामना करना पड़ा। कांग्रेस, शिवसेना (UBT), भाजपा और एनसीपी (अजित पवार) के उम्मीदवारों को नोटा वोटों के कारण मामूली अंतर से हार मिली।