शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

अकोला पूर्व मतदार संघात अकोला पूर्व मतदार संघात भाजपचे विद्यमान उमेदवार रणधीर सावरकर विजयाच्या उंबरठ्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 14:07 IST

Akola Assembly Vidhan Sabha Election 2024 Live Updates : BJP Candidate Randhir Savarkar ahead of 50 thousand votes : 50 हजारांनी घेतली आघाडी

अकोला : अकोला पूर्व मतदार संघात भाजप, उद्धव सेना आणि वंचित बहुजन आघाडी तिरंगी लढत झाली असून या भाजपचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांनी एकतर्फी निवडणूक करीत 48 हजार मतांची आघाडी घेतली आहे. 

अकोला पूर्व मतदार संघामध्ये आधीपासूनच भाजप, उद्धव सेना आणि वंचित बहुजन आघाडी या तीन पक्षांमध्येच चिरंजी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार खरी लढत ही उद्धवसेना आणि भाजप मध्येच झाल्याचे दिसून आले. निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा इफेक्ट दिसून आला. अकोला पूर्व मतदार संघामध्ये 24 व्या फेरी अखेर झालेल्या मतदानात उद्धव सेनेचे गोपाल दातकर यांनी 54 हजार 608 मते घेतली आहेत तर भाजपचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांनी एक लाख 2 हजार 911 मते घेतली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने हे 46567 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.  भाजपचे उमेदवार रणधीर सावरकर हे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असून केवळ त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे.लाडक्या बहिणींचा मिळाला आशीर्वाद 

रणधीर सावरकर यांच्या विजयाचा घोषणाची प्रतीक्षा अकोला-अकोला पूर्व मतदार संघामध्ये रणधीर सावरकर यांनी एकतर्फी बाजी मारत 26 व्या फेरी अखेर पन्नास हजार तीनशे अकरा मतांनी आघाडी मिळवली आहे. या निवडणुकीमध्ये रणधीर सावरकरांनी तिसऱ्यांदा हॅट्रिक करत इतिहास रचला आहे. लाडक्या बहिणींचे आणि ओबीसी मतं आपल्याकडे खेचणार सावरकर यशस्वी झाल्याचे बोललेले जात आहे.

अकोला पूर्व मतदार संघातून यापूर्वी काँग्रेसकडून निळकंठ सपकाळ यांनी दोनदा तर भारिप बहुसं वंचित बहुजन आघाडीकडून हरिदास भदे यांनी दोन वेळा विजय मिळविला आहे. त्यानंतर भाजपचे रणबीर सावरकर यांनी हा मतदार संघ ताब्यात घेईल दोनदा येथून विजय मिळविला तर आता ते हॅट्रिक च्या उंबरठ्यावर असून त्यांच्या विजयाची केवळ घोषणा करणे बाकी आहे. अकोला पूर्व मतदार संघामध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धव सेनेचे गोपाल दातकर यांनी 26 व्या फेरी अखेर 56 हजार 256 मते घेतली आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने यांनी पन्नास हजार एकशे साठ मते घेतली आहेत. या दोघांच्या मतांच्या बेरजेइतकीच मते रणधीर सावरकर यांनी घेतली आहेत.  सावरकर यांनी 26 व्या फेरी अखेर एक लाख 7261 मते घेतली आहेत. त्यामुळे सावरकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे केवळ त्यांच्या विजयाची घोषणा करणे बाकी असून महायुतीतील घटक पक्ष व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये विजयी जल्लोष सुरू केला आहे. 

दातकर व सुलताने यांची मतांची बेरीज एक लाख सहा हजारांवर कोल्हापूर मतदारसंघांमध्ये यंदा झालेल्या निवडणुकीमध्ये उद्धव सेनेचे गोपाल दातकर व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने यांनी एक लाख सहा हजार चारशे सोळा मते घेतली आहेत तर सावरकर यांनी या दोघाही उमेदवारांपेक्षा 851 मते अधिक घेतली आहेत. हे विशेष.

अग्रवाल यांच्या निकालामुळे विजय जल्लोष लांबला अकोला पश्चिम चे भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल हे सध्या पिछाडीवर चालत असल्यामुळे, रणधीर सावरकर यांच्या विजयाचा जल्लोष सध्या थांबलेला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024AkolaअकोलाRandhir Savarkarरणधीर सावरकरBJPभाजपाVidarbhaविदर्भ