शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेजी आली तरच सोन्याच्या भावावर परिणाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 5:01 PM

सोन्याचे भाव दसरा-दिवाळीतही कायम राहतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरीचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

- संजय खांडेकरअकोला : वित्तमंत्र्यांकडून करकपातीची घोषणा होताच शेअर बाजाराचा सेन्सेक्स दोन हजार अंकांनी उसळला. त्याचा परिणाम सराफा बाजारावरही गुरुवारी झाला. त्यामुळे सोन्याचे भाव ४०० रुपयांनी घसरले; मात्र ही घसरण फार नाही. जर आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढली अन् अमेरिकेत उघडणाऱ्या बाजारपेठेत तशी तेजी आली, तरच सोन्याच्या भावावर परिणाम होतील आणि सोन्याचे भाव घसरतील, अन्यथा सोन्याचे भाव दसरा-दिवाळीतही कायम राहतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरीचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली.देशात येत असलेल्या मंदीला रोखण्यासाठी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी करकपातीची घोषणा करीत शेअर बाजारास बुस्टर डोस दिला. त्यामुळे कार्पोरेट कंपन्यांवरील शेअरवर लागणाºया करामध्ये ५ टक्के सूट मिळाली आहे.सरचार्ज आणि मिनिमम अल्टरनेट टॅक्समध्ये ३ टक्के सूट मिळाली. निफ्टी-फिफ्टी कंपन्यांच्या ईपीएसमध्ये ८ ते १० टक्क्यांनी होत असलेली वाढ, सोबतच नफामध्ये वाढण्याचे संकेत मिळाल्याने बुधवारी कमालीचा कोसळलेला शेअर बाजार गुरुवारी तब्बल दोन हजार अंकांनी उसळला. दहा वर्षांतही एवढा सेन्सेक्स उसळला नव्हता. त्यामुळे देशभरासोबतच अकोल्यातील गुंतवणूकदार आणि शेअर ब्रोकरमध्ये उत्साहाचे वातावरण पसरलेले होते. शेअर बाजारात आलेली तेजी अशीच कायम राहिली आणि बँकिंग क्षेत्रात जर तरलता आली तर देशातील आर्थिक मंदी काही प्रमाणात का होईना, दूर होण्याची शक्यता आहे. मंदीतून सावरण्याच्या दृष्टीने वित्तमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे; मात्र बाजारपेठेतील अर्थव्यवस्था अधिक गतिशील करण्यासाठी काही ठोस निर्णय घेण्याचीदेखील गरज आहे, असे मत अकोल्यातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.फ्युचर बाजारात शॉर्ट सेलची जी परिस्थिती होती, ती कव्हर केल्या गेल्यामुळे गुरुवारी बाजारपेठेत काही तासांत तेजी आली; मात्र ज्या कंपन्यांचे शेअर कमालीचे पडले, त्यात अद्याप काहीही परिणाम जाणवलेला नाही. अशांमध्ये यस बँक, डीएचएफएल, जे.पी. असोसिएट, व्हिडिओकॉन, आर-पॉवर आदींसारख्या कंपन्यांचा समावेश आहे; मात्र अनेक कार्पोरेट कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत मोठा बदल झाला. यापैकी आॅटोमोबाइल्स कंपन्यांचा जास्त समावेश दिसून आला. सहा महिन्यांतील मंदीत पहिल्यांदा बाजारात तेजी दिसून आल्याने गुंतवणूकदार सुखावला आहे. 

-वित्तमंत्री सीतारामन यांच्या निर्णयाचे देशभरातील व्यापाºयांमध्ये स्वागत होत आहे. मोठ्या उद्योजकांना प्राप्तिकरात दिलेल्या सूटमुळे भारतात विदेशी गुंतवणुकीला वाव मिळेल. अप्रत्यक्षपणे चायनाला आपले बिºहाड गुंडाळावे लागेल. वित्तमंत्र्यांच्या या निर्णयामुळे भारतीय बाजारपेठेत निश्चितच तेजी येईल. जर आॅक्टोबरमध्ये रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली, तर भारतीय उद्योजकांना नवीन उद्योग उभारण्यासाठी मदत होईल.-अशोक डालमिया, ‘कॅट’चे राष्ट्रीय सचिव, अकोला.

 - आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढली तर चांगले चित्र दिसेल. डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक मजबूत होण्याची अनेकजण वाट पाहत आहेत. शेअर बाजारातील आॅटोमोबाइल्सच्या कार्पोरेट कंपन्यांमध्ये मोठा बदल दिसत आहे; मात्र याचा परिणाम प्रत्यक्षात वाहन विक्रीत झाला पाहिजे. सणासुदीच्या तोंडावर वाहने स्वस्त मिळाली तर बाजारात चैतन्य येईल. 

-हंसराज अग्रवाल, शेअर बाजर तज्ज्ञ, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसायGoldसोनंMarketबाजार