अकोला जिल्ह्यातील ठाणेदार व पोलीस अधिकाऱ्यांची लवकरच अदलाबदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 13:23 IST2018-11-10T13:21:40+5:302018-11-10T13:23:14+5:30
अकोला: जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील कार्यरत असलेल्या ठाणेदार व पोलीस अधिकाऱ्यांची लवकरच खांदेपालट होणार असल्याची माहिती आहे.

अकोला जिल्ह्यातील ठाणेदार व पोलीस अधिकाऱ्यांची लवकरच अदलाबदल
अकोला: जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील कार्यरत असलेल्या ठाणेदार व पोलीस अधिकाऱ्यांची लवकरच खांदेपालट होणार असल्याची माहिती आहे. यामधील अकोला शहरातील काही ठाणेदारांसह तालुक्याच्या ठिकाणावरील ठाणेदार बदलण्यात येणार असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील तीन सहायक पोलीस निरीक्षकाांच्या कामकाज पडताळणीनंतर त्यांच्यातच फेरबदल करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील काही ठाणेदारांची कामगिरी प्रचंड सुमार असून, गुन्हे प्रलंबित असल्याचे प्रमाण अधिक आहे. ठाणेदारांसोबतच, दुय्यम दर्जाचे पोलीस अधिकारी व काही कर्मचारी माध्यमांमध्ये बातम्या प्रकाशित करून स्वत:ची पाठ थोपटून घेत असून, ही ठाणेदारांची चमकोगिरी वरिष्ठांच्या लक्षात आली असल्याने त्यांच्यावरील विश्वास कमी झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अकोला पोलीस दलात नव्याने आणखी एक पोलीस निरीक्षक रुजू झाल्याने त्यांच्यावर शहरातील एका पोलीस ठाण्याच्या जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर तालुक्याच्या ठिकाणांवर वाढलेले अवैध धंदे लक्षात घेता या ठाणेदारांचेही खांदेपालट होणार आहेत. सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या ठाणेदारांना दुय्यम दर्जाचे अधिकारी म्हणून पाठवले जाणार आहे. गत वर्षात चांगली कामगिरी असलेल्या अधिकाºयांना महत्त्वाची ठाणी दिल्या जाणार आहेत. ग्रामीणमधील एका ठाणेदाराला जिल्हा विशेष शाखा, तर तेथील पोलीस निरीक्षक अनिल जुमळे यांना लवकरच पोलीस ठाणे मिळण्याची शक्यता आहे. पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षकांनाही या खांदेपालटमध्ये पोलीस ठाण्यांची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.