रेतीची अवैध वाहतूक; तीन वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST2021-04-04T04:19:31+5:302021-04-04T04:19:31+5:30

पातूर येथून बाळापूरकडे उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी येत असताना रेतीची अवैध वाहतूक करणारे वाहन क्रमांक ...

Illegal transportation of sand; Three vehicles seized | रेतीची अवैध वाहतूक; तीन वाहने जप्त

रेतीची अवैध वाहतूक; तीन वाहने जप्त

पातूर येथून बाळापूरकडे उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी येत असताना रेतीची अवैध वाहतूक करणारे वाहन क्रमांक (एम.एच.०२एक्सए ६४३४) व ट्रॅक्टर (एम.एच.३० ए ९१७२) ट्राॅली क्र. (एम.एच.३० जे २७१२) वाहने पकडली. तसेच एक वाहन पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईत चालक सै. हुसेन सै. अली (रा. पातूर), चालक गजानन रमेश ढोरे, गोविंद मुरलीधर केकन व निवृत्ती राजेंद्र म्हैसने यांच्याविरुद्ध नायब निवासी तहसीलदार नंदकिशोर नाजुकराव कुंभरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाळापूर पोलिसांनी ३७९, १८३ भादंविच्या महसूल कायदा १९६६ नुसार १४३ गुन्हा दाखल केला. पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.

Web Title: Illegal transportation of sand; Three vehicles seized