शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

गुरांची अवैध वाहतुक ; बाळापूरात पोलीस उपनिरीक्षकांना वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 4:59 PM

बाळापूर : रात्री गस्त घालत असलेले बाळापूरचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांनी मार्गावर नाकेबंदी करीत असताना भरधाव वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने त्याचे वाहन विठ्ठल वाणी यांच्या अंगावर घालून त्यांना बाजुला खाली पडले.

ठळक मुद्देमार्गावर नाकाबंदी करणाऱ्या उपनिरीक्षकास गुरांची अवैध वाहतुक करणाऱ्यांनी वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला.यामध्ये घटनेमध्ये पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.वाणी यांनी पिस्तुल काढून आरोपीवर रोखून दोन्ही आरोपींसह वाहन बाळापूर पोलीस स्टेशनला आणले.

बाळापूर : मूर्तिजापूरकडून दोन प्रवासी वाहनांमध्ये अवैध गुरांची वाहतूक केली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून अकोलाचे उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने यांनी २६ डिसेंबरच्या रात्री एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने एक वाहन पकडले. परंतु दुसºया वाहनचालकाने पोलिसांना चकवून भरधाव वेगाने बाळापूरकडे वाहन दामटले. ही माहिती अकोलाच्या पोलीस नियंत्रण कक्षाने बाळापूर पोलिसांना दिली. या माहितीवरून रात्री गस्त घालत असलेले बाळापूरचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांनी मार्गावर नाकेबंदी करीत असताना भरधाव वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने त्याचे वाहन विठ्ठल वाणी यांच्या अंगावर घालून त्यांना बाजुला खाली पडले. त्यावेळी त्या भारधाव वाहनाचा पाठलाग करून बाळापूर शहरात पोलिसांनी सदर वाहनाला घेरून पकडले. यामध्ये घटनेमध्ये पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.परप्रांतातून अमरावती मार्गे गुरांची वाहतूक करण्यासाठी अमरावतीमधील मंगेश रमेश वानखडे यांच्या एमएच २२ डी २५५५ क्रमांकाच्या दोन प्रवासी वाहनामध्ये पाच गुरे भरून ती बाळापूरमध्ये पोहोचवण्यासाठी चालक शे. अजीज शे. वजीर (३५) व शे. एहेसान शे. अमन (३३) रा. लाल ताजनगर, अमरावतीवरून रात्री उशिरा निघाले. ही माहिती अकोला उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने यांना मिळाल्याने त्यांनी मंगळवारी रात्री ४ वाजता नाकेबंदीत एक वाहन अकोल्याला पकडले. या कारवाईच्या वेळेस तेथून पळ काढलेल्या वाहनाने बाळापूरजवळ नाकाबंदी करणाºया पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांच्या अंगावर वाहन नेऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाणी जीव वाचवताना वाणी गंभीर जखमी झाले. त्यांनी जखमी अवस्थेतही पळून जाणाºया वाहनाचा पाठलाग सुरू केला असता त्यांचे पोलीस वाहन उलटता-उलटता वाचले. पसार झालेले वाहन बाळापुरात जाताच दोन्ही बाजुने पोलिसांच्या वाहनांनी लाल सवारी परिसरात सदर वाहन पकडले. यानंतरही त्यातील दोन आरोपी पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते.पोलीस कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने पोलीस उपनिरीक्षक वाणी यांनी शेवटी त्यांच्याजवळील पिस्तुल काढून आरोपीवर रोखून दोन्ही आरोपींसह सदर वाहन बाळापूर पोलीस स्टेशनला आणले व उपरोक्त दोन्ही आरोपींना अटक केली. पाचही गुरांची सुटका करून उपचारासाठी गोशाळेत पाठविले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दखल प्रक्रिया सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणBalapurबाळापूरCrimeगुन्हा