आलेगावात अवैध सागवान साठा जप्त

By Admin | Updated: April 30, 2017 19:49 IST2017-04-30T19:49:49+5:302017-04-30T19:49:49+5:30

आलेगाव : चान्नीचे ठाणेदार यांनी ३० एप्रिलच्या सकाळी येथील अवैध गावठी दारू अड्ड्यवर धाड टाकली असता, तेथे अवैध सागवान लाकडाचा साठा आढळून आला.

Illegal sewage stocks seized in Golgonda | आलेगावात अवैध सागवान साठा जप्त

आलेगावात अवैध सागवान साठा जप्त

एका आरोपीस अटक : दोघे फरार

आलेगाव : चान्नीचे ठाणेदार वैभव पाटील यांनी ३० एप्रिलच्या सकाळी ६ वाजता येथील अवैध गावठी दारू अड्ड्यवर धाड टाकली असता तेथे अवैध सागवान लाकडाचा साठा दिसल्याने त्यांनी वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्या माहितीवरून वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दरोगा एच. आर. राठोड, निकाळणे, जुनघरे, ढोके, जाधव, आडे, दामोधर जाधव, साळवे, राजीक, गजानन काळदाते, गजानन मर्तंडकार, पंजाब तेलगोटे, प्रकाश ठाकरे आदी कर्मचाऱ्यांना घटनेच्या जागी येऊन संयुक्त कारवाई केली.
यावेळी ११ हजार रुपये किमतीचे अवैध सागवान लाकुड जप्त करण्यात आले. त्यामध्ये सै. रोशन सै. नमोद्दीन, तलीयार खाँ कालेखाँ, अमजदखॉ ऊर्फ गुड्डू मुमताज खाँ हे आरोपी असून सैयद रोशन हा आरोपी त्याजवळून दारू पकडल्यामुळे पोलिसांच्या ताब्यात आहे. अन्य दोन आरोपी पसार झाल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले. आरोपीविरुद्ध १९४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वनकर्मचारी करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Illegal sewage stocks seized in Golgonda