अवैध दारू विक्री; देशी दारूच्या १४४ बाटल्या जप्त

By Admin | Updated: April 14, 2017 01:52 IST2017-04-14T01:52:40+5:302017-04-14T01:52:40+5:30

अकोला: स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी शहरातील दोन ठिकाणच्या अवैध दारू अड्ड्यांवर छापा घालून तीन जणांना अटक केली. त्यांच्याकडून १४४ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या.

Illegal liquor sale; 144 bottles of country liquor were seized | अवैध दारू विक्री; देशी दारूच्या १४४ बाटल्या जप्त

अवैध दारू विक्री; देशी दारूच्या १४४ बाटल्या जप्त

अकोला: स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी शहरातील दोन ठिकाणच्या अवैध दारू अड्ड्यांवर छापा घालून तीन जणांना अटक केली. त्यांच्याकडून १४४ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या.
स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी चांदूर येथे दारूच्या बाटल्या घेऊन जाणारा विष्णू निचळे (रा. खदान) याला अटक केली. त्याच्याकडून ९६ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी नीलेश पातोडे (३३) आणि उस्ताम शाह हारूण शाह (२४) यांना अटक केली. त्याच्याकडून ४८ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. जप्त केलेल्या दारूच्या बाटल्यांची किंमत ८ हजार ६४0 रुपये आहे.

Web Title: Illegal liquor sale; 144 bottles of country liquor were seized