विद्यार्थ्यांनी बेशिस्तपणे वाहन चालविल्यास मुख्याध्यापक, प्राचार्यांवर कारवाई!

By Admin | Updated: November 22, 2015 02:25 IST2015-11-22T02:25:42+5:302015-11-22T02:25:42+5:30

जिल्हाधिका-यांचा आदेश : शाळांची होणार आकस्मिक पाहणी.

If the students unselfishly drive, the headmaster, the proceedings on the prints! | विद्यार्थ्यांनी बेशिस्तपणे वाहन चालविल्यास मुख्याध्यापक, प्राचार्यांवर कारवाई!

विद्यार्थ्यांनी बेशिस्तपणे वाहन चालविल्यास मुख्याध्यापक, प्राचार्यांवर कारवाई!

अकोला : शाळा, महाविद्यालय परिसरात विद्यार्थी नियमबाह्य दुचाकी वाहन चालविताना आढळल्यास थेट संबंधित मुख्याध्यापक आणि प्राचार्यांंंवरच शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शनिवारी दिला. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांची आकस्मिक पाहणी करण्यात येणार आहे. अकोला शहरात शुक्रवारी मालधक्का परिसरात झालेल्या युवतीच्या अपघातानंतर पुन्हा एकदा शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळकरी मुलं आणि महाविद्यालयीन विद्यार्थी शहरात दुचाकी वाहने चालविताना दिसतात. अल्पवयीन मुलांकडून नियमबाह्य वाहने चालविली जात असल्याने बहुतांश वेळा वाहतुकीला अडथळा होतो आणि ते अपघातास कारणीभूत ठरते. त्यामुळे आता थेट शाळा, महाविद्यालय परिसरात दुचाकी चालविण्यास विद्यार्थ्यांंंवर प्रतिबंध लादला जाणार आहे. यापुढे विद्यार्थी उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात नियमबाह्य वाहने चालविताना दिसले तर थेट त्यासाठी मुख्याध्यापक आणि प्राचार्यांंंनाच दोषी ठरवून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांंंच्या हातात वाहन दिल्यानंतर विनापरवाना आणि हेल्मेटशिवाय ते सुसाट वाहने चालवितात. त्यांचे हे कृत्य अपघातास कारणीभूत ठरते. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन न देणे, त्यांच्यावर बालवयातच वाहतुकीचे नियम पाळण्याबाबतचे संस्कार करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांवरही होणार कारवाई शाळेत आणि महाविद्यालयात दुचाकीवरून येणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हेल्मेटशिवाय वाहने चालवितात. त्यामुळे विद्यार्थ्यांंंवर कोणते संस्कार घडणार, हा विचार करून शिक्षक व कर्मचार्‍यांनीही शाळा, महाविद्यालयात हेल्मेट घालूनच यावे, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले. जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हेल्मेटशिवाय दुचाकी वाहने चालवतील त्यांच्यावरही कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

Web Title: If the students unselfishly drive, the headmaster, the proceedings on the prints!