मनपा कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:20 IST2021-02-05T06:20:35+5:302021-02-05T06:20:35+5:30
केंद्र शासनाने १ जानेवारी २०१६ पासून ७ वा वेतन आयोग अमलात आणला असून, राज्य शासनाने सरकारी तथा निमसरकारी कर्मचाऱ्यांना ...

मनपा कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदाेलन
केंद्र शासनाने १ जानेवारी २०१६ पासून ७ वा वेतन आयोग अमलात आणला असून, राज्य शासनाने सरकारी तथा निमसरकारी कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाच्या तरतुदी लागू केल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्यात काही महापालिकांनी कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू केला; परंतु मनपातील कर्मचाऱ्यांना अद्यापही ७ वा वेतन आयोगाचा लाभ मिळाला नाही.
कर्मचाऱ्यांना ६ वा वेतन आयोग, रजा रोखीकरणाची देणी अद्यापही अदा करण्यात आली नाही. त्यामुळे मनपा कर्मचारी आर्थिक संकटात सापडले असल्याचे पत्रकार परिषदेत साजीद खान यांनी सांगितले. मनपात सेवा बजावताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपातत्त्वावर नियुक्ती मिळाली नसून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. मागील १५ ते १८ वर्षांपासून मानधनावर कर्मचारी कार्यरत असून, शासनाने त्यांना कायम करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मुद्यावर प्रशासन ढिम्म असल्याचे दिसत आहे. प्रशासनाने येत्या गुरुवारपर्यंत ताेडगा न काढल्यास आंदाेलन छेडण्याचा इशारा साजीद खान यांनी दिला आहे.