पाळोदी येथे मूर्तीची विटंबना

By Admin | Updated: May 2, 2017 01:26 IST2017-05-02T01:26:01+5:302017-05-02T01:26:01+5:30

आगर: येथून जवळच असलेल्या पाळोदी येथे अज्ञात व्यक्तीने ३० एप्रिलच्या रात्री पुतळ्यास दगड मारून विटंबना केली.

Idol idol at Parrodi | पाळोदी येथे मूर्तीची विटंबना

पाळोदी येथे मूर्तीची विटंबना

आगर: येथून जवळच असलेल्या पाळोदी येथे अज्ञात व्यक्तीने ३० एप्रिलच्या रात्री पुतळ्यास दगड मारून विटंबना केली. या प्रकरणी गावातील युवकांनी पोलिसात तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. पाळोदी येथे पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार १ मे रोजी सकाळी उघडकीस आला. ही माहिती मिळताच आगर येथील सामाजिक कार्यकर्ते शेषराव शिरसाट, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मोहन शिरसाट, पोलीस पाटील पती संतोष शिरसाट यांनी पाळोदी येथे भेट देऊन पाहणी केली.
तसेच गावातील सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन केले. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याची दखल घेऊन ठाणेदार एस. डी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच सायंकाळी गावाला भेट देऊन पाहणी केली. आरोपीस लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. तसेच गावात शांतता ठेवण्याचे आवाहन केले.

Web Title: Idol idol at Parrodi