चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

By Admin | Updated: June 15, 2017 20:02 IST2017-06-15T20:02:10+5:302017-06-15T20:02:10+5:30

सुकळी नंदापूर येथील घटना : आरोपीस अटक

Husband's wife murdered on suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
कानशिवणी : बोरगाव मंजू पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या सुकळी नंदापूर येथील पायरू ग्यानुजी तायडे (३५) याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी प्रतिभा पायरू तायडे (३०) हिचा चाकू भोसकुन खून केला. ही घटना १५ जून रोजी सकाळी ९.३० वाजता घडली. त्यानंतर आरोपी स्वत:हून बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला असता, पोलिसांनी त्याला अटक केली.

सुकळी नंदापूर येथील पायरू ग्यानुजी तायडे व पत्नी प्रतिभा पायरू तायडे हे दोघे जण शेळ्या चारून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. पायरूच्या मनात पत्नी प्रतीभाच्या चारित्र्याविषयी संशय होता. ते १५ जून रोजी सकाळी ९ वाजता नेहमीप्रमाणे शेळ्या घेऊन चारण्याकरिता देवळी फाट्याजवळ आले. तेथे शेतरस्त्याने शेळ्या चारत असताना अचानक पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. त्या वादात पायरू ग्यानुजी तायडे याने पत्नी प्रतिभा पायरू तायडे हिच्या डाव्या व उजव्या कुशीत, मानेवर, पोटात, दंडावर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे ती घटनास्थळीच ठार झाली. त्यानंतर त्याने गावचे पोलीस पाटील, सरपंच व गावातील अन्य नागरिक सोबत घेऊन बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराड ,बोरगावमंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार पी.के. काटकर यांनी पोलीस उपनिरीक्षक युवराज उईके, हे.कॉ.महादेव पवार, विष्णू ढोरे व ठसेतज्ज्ञांसह घटनास्थळास भेट देऊन घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा केला. आरोपी पायरू तायडेविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास बोरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पी. के. काटकर, उइके, बिट जमादार महादेव पवार, मोहन ढोरे, गवळी, इंगळे करीत आहेत.

Web Title: Husband's wife murdered on suspicion of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.