पती, पत्नी आणि ‘ती’...दोघींमध्ये रंगली फ्री स्टाइल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 12:52 IST2019-08-10T12:51:50+5:302019-08-10T12:52:01+5:30

पतीची प्रेयसी आणि पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि दोघींमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

Husband, wife and 'she' fight between two in Akola | पती, पत्नी आणि ‘ती’...दोघींमध्ये रंगली फ्री स्टाइल 

पती, पत्नी आणि ‘ती’...दोघींमध्ये रंगली फ्री स्टाइल 

अकोला: लग्नाची बायको असताना, पतीने घरात दुसरी बाई ठेवणे कोणत्या पत्नीला सहन होणार आहे, पतीने घरात आपल्या प्रेयसीला आणल्यामुळे संतप्त झालेल्या पत्नीने रौद्र अवतार धारण केला. पतीची प्रेयसी आणि पत्नीमध्ये शुक्रवारी दुपारी चांगलीच फ्री स्टाइल झाली. त्यामुळे पोलिसांनी कलम १६0 नुसार नोंद करून दोघींना समजपत्र दिले.
खदान परिसरातील एका युवकाने लग्नाची बायको घरात असताना, दुसऱ्या युवतीसोबत सूत जुळविले. हे प्रेमप्रकरण सुरू असतानाच, पतीने त्या प्रेयसीला घरात आणले. यावरून पती-पत्नीमध्ये चांगलेच खटके उडाले. अधूनमधून दोघींमध्ये धुसफूस सुरूच राहायची, वाद व्हायचे. यातूनच काही दिवसांपूर्वी या युवकाने प्रेयसीला मारहाण केली होती. या प्रकरणात खदान पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. काही दिवस उलटत नाहीत तोच, शुक्रवारी दुपारी पतीची प्रेयसी आणि पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि दोघींमध्ये तुंबळ हाणामारी झाली. अखेर प्रकरण खदान पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी दोघींवर कारवाई करून समजपत्र दिले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Husband, wife and 'she' fight between two in Akola