पती, सासू सासऱ्याने केला सूनेचा खून; आत्महत्येचा रचलेला बनाव झाला उघड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 11:05 IST2020-08-11T11:04:23+5:302020-08-11T11:05:13+5:30
ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आल्यानंतर तसेच चौकशीअंती या तिघांनी गळफास देऊन तिचा खून केल्याचे कबूल केले

पती, सासू सासऱ्याने केला सूनेचा खून; आत्महत्येचा रचलेला बनाव झाला उघड!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलवाडे प्लॉटमधील रहिवासी एका सुनेने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करणाºया पती, सासरा व सासूविरुद्ध जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोमवारी रात्री उशिरा तिघांनाही अटक केली आहे. घरगुती कारणावरून सुमय्या परवीन शेख इमरान या सुनेचा पती शेख इमरान शेख जब्बार, सासरा शेख जब्बार शेख सत्तार, सासू रजिया बी शेख जब्बार यांनी गळफास देऊन खून केला.
या संदर्भात पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुलवाडे प्लॉट येथील रहिवासी शेख इमरान याचा विवाह एक जानेवारी २०२० रोजी सुमय्या परवीन हिच्याशी झाला होता. त्यानंतर माहेरून पैसे आणण्यासाठी पती, सासरा आणि सासू तिला नेहमी तगादा लावत होते. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता. शेख इमरान व सासरा शेख जब्बार हे मिस्त्रीचे काम करीत होते. पैसे आणण्यावरून पती, सासरा आणि सासू यांनी तिचा रविवारी रात्री छळ केला. त्यानंतर या तिघांनाही राग अनावर झाल्यानंतर तिचा कपड्याच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिने गळफास घेतल्याचा बनाव या तिघांनी केला. त्यानंतर या तिघांनी तिला सोमवारी सकाळी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी जुने शहर पोलिसानी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपस सुरू केला असता पथकाने यामध्ये पती शेख इमरान, सासरा शेख जब्बार, सासू रजिया बी हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच वैद्यकीय अहवालानंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आल्यानंतर तसेच चौकशीअंती या तिघांनी गळफास जबरदस्तीने देऊन तिचा खून केल्याचे कबूल केले. जुने शहर पोलिसांनी यामध्ये पती, सासरा, सासू या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली. हा तपास पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिव सुळकर, अनिस पठाण, महेंद्र बहादूरकर, अनिल खेडेकर, नितीन मगर, धनराज बायस्कर यांनी केला.