पत्नीवर शस्त्राने हल्ला करणाऱ्या पतीस कोठडी

By Admin | Updated: April 13, 2017 01:49 IST2017-04-13T01:49:34+5:302017-04-13T01:49:34+5:30

अकोट : संशयाच्या कारणावरून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याची घटना ११ एप्रिल रोजी रात्री लोहारी मार्गावर घडली.

Husband attacked with wife | पत्नीवर शस्त्राने हल्ला करणाऱ्या पतीस कोठडी

पत्नीवर शस्त्राने हल्ला करणाऱ्या पतीस कोठडी

अकोट : संशयाच्या कारणावरून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याची घटना ११ एप्रिल रोजी रात्री लोहारी मार्गावर घडली. याप्रकरणी आरोपी पती अशोक टोलमारे याला पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मूळचा रुईखेड येथील रहिवासी असलेला अशोक टोलमारे हा एम.आय.डी.सी. परिसरात काम करतो. तो गत काही महिन्यांपासून पत्नीवर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वितुष्ट आले. त्यामुळे त्याची पत्नी दीपाली ही आईकडे राहते. ११ एप्रिल रोजी रात्री आरोपी अशोक टोलमारे याने पत्नीला लोहारी मार्गावर भेटीकरिता बोलाविले. या ठिकाणी त्याने वादावादी करून तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध भादंवि ३०७ , ४९८ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

Web Title: Husband attacked with wife