विजेच्या धक्क्याने पती-पत्नी ठार

By Admin | Updated: July 4, 2017 20:21 IST2017-07-04T20:21:07+5:302017-07-04T20:21:07+5:30

मूर्तिजापूर: भाड्याच्या घरात कपडे वाळत घालताना विजेच्या धक्कयाने पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना मूर्तिजापूर ग्रामसेवक कॉलनी येथे ४ जुलै रोजी घडली.

Husband and wife killed by electric shock | विजेच्या धक्क्याने पती-पत्नी ठार

विजेच्या धक्क्याने पती-पत्नी ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर: भाड्याच्या घरात कपडे वाळत घालताना विजेच्या धक्कयाने पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना मूर्तिजापूर ग्रामसेवक कॉलनी येथे ४ जुलै रोजी सकाळी ९.५६ वाजता घडली. रमेश शेषराव गीते (६७) व महानंदा रमेश गीते (६०) असे मृतक पती-पत्नीचे नाव आहे.
रत्ना विश्वनाथ डोंगरदिवे यांचे ग्रामसेवक कॉलनी येथे घर असून, ते भाड्याने दिले. तीन-चार कुटुंब भाड्याने राहतात. रमेश गीते व महानंदा गीते हे भाड्याने राहत. त्यांना एक विवाहित मुलगी आहे. पती-पत्नी भाड्याने राहत असलेल्या घरी कपडे वाळवण्यासाठी तारेवर कपडे टाकताना प्रथम महानंदा गीते यांना विजेचा धक्का लागला. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात रमेश गीते यांनाही विजेचा जबर धक्का लागला. विजेच्या धक्कयाने दोघेही जागीच ठार झाले. अमोल जामनिक यांच्या फिर्यादीवरून मूर्तिजापूर शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जनार्धन खंडेराव तपास करीत आहेत.

Web Title: Husband and wife killed by electric shock