वादळवाऱ्यामुळे शेकडो लिंबांची झाडे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST2021-05-30T04:17:09+5:302021-05-30T04:17:09+5:30

शिर्ला : परिसरात शुक्रवारी वादळवाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. वाऱ्यामुळे शिर्ला शेतशिवारातील लिंबांची झाडे जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या ...

Hundreds of lemon trees were uprooted by the storm | वादळवाऱ्यामुळे शेकडो लिंबांची झाडे जमीनदोस्त

वादळवाऱ्यामुळे शेकडो लिंबांची झाडे जमीनदोस्त

शिर्ला : परिसरात शुक्रवारी वादळवाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. वाऱ्यामुळे शिर्ला शेतशिवारातील लिंबांची झाडे जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.

पातूर तालुक्यातील शिर्ला सोळा मैल परिसरात शुक्रवारी वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या परिसरात रमाबाई अशोक अंधारे यांच्या शेतातील ३३ लिंबांची झाडे, देविदास निमकडे यांच्या शेतातील २५ लिंबांची झाडे व तीन आंब्यांची झाडे, काशिराम निमकडे यांच्या शेतातील आठ लिंबांची झाडे अशी अनेक झाडे जमीनदोस्त झाली. तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतातील आंब्याची फळे गळून खाली पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त भागात पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

===Photopath===

290521\img-20210529-wa0034.jpg

===Caption===

????? ???? ?????????

Web Title: Hundreds of lemon trees were uprooted by the storm