अकोल्यातील हनुमाननगरात दीड लाखांची घरफोडी
By Admin | Updated: August 18, 2014 01:45 IST2014-08-18T01:27:57+5:302014-08-18T01:45:24+5:30
बंद घर फोडून चोरट्यांनी सोने, चांदी व रोख रकमेसह दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास.

अकोल्यातील हनुमाननगरात दीड लाखांची घरफोडी
अकोला: लहान उमरी परिसरातील हनुमाननगरातील बंद घर फोडून चोरट्यांनी सोने, चांदी व रोख रकमेसह दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.
हनुमाननगरात राहणारे प्रभाकर एकनाथ घोडके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १५ ऑगस्ट रोजी ते कुटुंबीयांसह श्रीरामपूर येथे गेले होते. दरम्यान, चोट्यांनी त्यांच्या घरातील दरवाजाचा कडीकोंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील सोन्याच्या ४ बांगड्या, १ कंठमणी, रोख २ हजार रुपये, असा एकूण १ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. शनिवारी प्रभाकर घोडके यांचा मुलगा घरी आल्यानंतर त्याला चोरट्यांनी घर फोडल्याचे लक्षात आले. त्याच्या तक्रारीनुसार सिव्हिल लाईन पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.