How many farmers get help ; submit the report | ‘अवकाळी’ची मदत किती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा?
‘अवकाळी’ची मदत किती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा?


अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांसाठी दोन टप्प्यात वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या रकमेपैकी किती शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची किती रक्कम जमा करण्यात आली, यासंदर्भात बँकांकडून आढावा घेऊन, अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) व तहसीलदारांना दिले.
अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शासनामार्फत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकºयांना मदत वाटप करण्याच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांची मदत १९ नोव्हेंबर रोजी आणि दुसºया टप्प्यात १५८ कोटी ५४ लाख ८१ हजार रुपयांची मदत १३ डिसेंबर रोजी शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. दोन टप्प्यात उपलब्ध २३१ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली. मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी शेतकºयांच्या याद्या आणि मदतीची रक्कम तहसील कार्यालयांकडून बँकांमध्ये जमा करण्यात आली; परंतु मदतीची रक्कम अद्याप बँक खात्यात जमा झाली नसल्याच्या अनेक शेतकºयांच्या तक्रारी आहेत. त्यानुषंगाने वितरित मदतीच्या रकमेपैकी किती शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची किती रक्कम जमा करण्यात आली, यासंदर्भात बँकांकडून आढावा घेऊन, अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना १६ जानेवारी रोजी पत्राद्वारे दिले.

बँकांच्या प्रतिनिधींकडून‘एसडीओ’ घेणार आढावा!
जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार शेतकºयांच्या मदतीसाठी उपलब्ध रक्कमपैकी बँकांमध्ये जमा करण्यात आलेली रक्कम, बँकांकडून आतापर्यंत किती शेतकºयांच्या खात्यात मदतीची किती रक्कम जमा करण्यात आली, यासंदर्भात जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि तहसीलदार बँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन आढावा घेणार आहेत.

जिल्ह्यातील शेतकºयांच्या मदतीसाठी वितरित करण्यात आलेल्या रकमेपैकी किती शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची किती रक्कम जमा करण्यात आली, यासंदर्भात आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांमार्फत जिल्ह्यातील एसडीओ-तहसीलदारांना देण्यात आले.
- संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी

 

Web Title: How many farmers get help ; submit the report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.