सर्वांसाठी घरे ही योजना अपयशी, ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By आशीष गावंडे | Updated: August 9, 2023 15:42 IST2023-08-09T15:41:50+5:302023-08-09T15:42:59+5:30

नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. 

Housing for all scheme failed, Thackeray group's march on Collector's office | सर्वांसाठी घरे ही योजना अपयशी, ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सर्वांसाठी घरे ही योजना अपयशी, ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अकोला - केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरे-२०२२’ही योजना सपशेल अपयशी ठरली आहे. सर्वसामान्य व गरीब लाभार्थ्यांना घरकुल बांधून देण्याचे आश्वासन देत त्यांची फसवणूक केल्याचा आरोप करित शिवसेना (ठाकरे गट) आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. 

जिल्ह्यातील ६९ हजार लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारणाऱ्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी येत्या बुधवारी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
 

Web Title: Housing for all scheme failed, Thackeray group's march on Collector's office