मूर्तिजापूरमध्ये होमगार्ड पत्नीची पतीने केली हत्या; चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 13:05 IST2017-08-28T13:04:11+5:302017-08-28T13:05:48+5:30
मूर्तिजापूरमध्ये होमगार्ड पत्नीची पतीने हत्या केल्याची माहिती मिळते आहे.

मूर्तिजापूरमध्ये होमगार्ड पत्नीची पतीने केली हत्या; चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याची माहिती
ठळक मुद्देमूर्तिजापूरमध्ये होमगार्ड पत्नीची पतीने हत्या केल्याची माहिती मिळते आहे. धारदार शस्त्राने वार करून पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अकोला, दि. 28- मूर्तिजापूर येथील चिखली रोड परिसरातील होमगार्ड असलेल्या पत्नीची धारदार शस्त्राने वार करून पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली असल्याची माहिती मिळते आहे. राजश्री निशानराव असं मृत महिलेचं नाव असून चारित्र्याच्या संशयावरून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
मृत्यू झालेल्या महिलेला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. पण तीन मुलांपैकी मोठ्या मुलचा मागील वर्षी अपघातात मृत्यू झाला, दुसरा मुलगा सध्या इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे. तर त्यांच्या मुलीचं लग्न झालं आहे.