घरात कत्तलखाना चालविणा-यास कोठडी

By Admin | Updated: May 8, 2017 02:37 IST2017-05-08T02:37:18+5:302017-05-08T02:37:18+5:30

न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

House in the house of slaughterhouse | घरात कत्तलखाना चालविणा-यास कोठडी

घरात कत्तलखाना चालविणा-यास कोठडी

अकोला : पातूर रोडवरील इन्स्पेक्टरनगरातील घरातच कत्तलखाना चालविणार्‍या आरोपीस जुने शहर पोलिसांनी रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पातूर रोडवरील इन्स्पेक्टरनगरमध्ये घरातच कत्तलखाना चालवित असल्याची माहिती जुने शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घरावर छापा घालून शेख इर्शाद शेख रहीम याला अटक केली. त्याने घरातील एका खोलीमध्ये डांबून ठेवलेल्या १६ बैलांची पोलिसांनी सुटका करून त्यांना जीवदान दिले. पोलिसांनी जप्त केलेले बैल इर्शाद याने कत्तल करण्याच्या उद्देशानेच आणल्याची कबुली दिली; परंतु त्याने हे बैल कोणाकडून खरेदी केले, याची माहिती पोलिसांनी घ्यायची असल्याने, पोलिसांनी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.

Web Title: House in the house of slaughterhouse