धाकली येथे घराला आग; दोन लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST2021-03-08T04:19:28+5:302021-03-08T04:19:28+5:30

धाकली येथील गजानन लक्ष्मण जावळे यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत घरातील साहित्य, गहू, सोयाबीन व रोख रक्कम ...

House fire at Dhakli; Loss of two lakhs | धाकली येथे घराला आग; दोन लाखांचे नुकसान

धाकली येथे घराला आग; दोन लाखांचे नुकसान

धाकली येथील गजानन लक्ष्मण जावळे यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत घरातील साहित्य, गहू, सोयाबीन व रोख रक्कम जळून खाक झाली आहे. गजानन जावळे हे नातेवाइकाला भेटण्यासाठी गेले असता अचानक त्यांच्या घराला आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले होते. जावळे यांच्या घराशेजारी असलेल्या परशराम जावळे यांच्या घरालाही आग लागली होती. ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. आग लागल्याची माहिती संत गाडगेबाबा शोध व बचाव प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली असता त्यांनी अग्निशमन विभागास कळविले. अग्निशमन विभागाची गाडी गावात पोहोचेपर्यंत ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळविले होते. दीपक सदाफळे, सरपंच महेंद्र पाटील गाढवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. (फोटो)

--------------------------------------------------------------

Web Title: House fire at Dhakli; Loss of two lakhs