मुर्तीजापूर येथे महिलेचे घर जळाले; ५ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 18:24 IST2020-12-25T18:19:59+5:302020-12-25T18:24:59+5:30
Fire in Murtijapur : शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे.

मुर्तीजापूर येथे महिलेचे घर जळाले; ५ लाखांचे नुकसान
मूर्तिजापूर : जुन्या शहरातील टांगा चौकात असलेल्या एका घराला दुपारी १ वाजताच्या दरम्यान आग लागून ५ लाखाचे नुकसान झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी घडली.
येथील टांगा चौकात राहणाऱ्या कस्तुरी चंद्रबली गुप्ता ही महीला मोल-मजूरीचे काम करते. घटनेच्या दिवशी त्या येथील बाजारात फुटाणे विकण्यासाठी बाजारात गेल्या असता दुपारी त्यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. या आगीत घरातील धान्य व वस्तू, इलेक्ट्रॉनिक लाईटचे वायर, घरातील कपडे जळून खाक झाले आहेत. या आगीत त्यांचे किमान ५ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पहाता पहाता रौद्ररूप धारण केले. आगीला आटोक्यात आणण्यासाठी येथील नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. सदर महिलेला शासकीय मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्यांना येथील नगर सेवक व्दारकाप्रसाद दुबे यांनी दोन हजार रुपयांची मदत केली.