प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदूतांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:13 IST2021-06-23T04:13:47+5:302021-06-23T04:13:47+5:30

अकोला : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने महानगर तथा जिल्ह्यात रक्तदानाविषयी जनजागृती करणारे, कुठल्याही क्षणी गरजू रुग्णांना रक्ताची उपलब्धता ...

Honors of blood angels on behalf of Pradesh Youth Congress | प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदूतांचा सन्मान

प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदूतांचा सन्मान

अकोला : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने महानगर तथा जिल्ह्यात रक्तदानाविषयी जनजागृती करणारे, कुठल्याही क्षणी गरजू रुग्णांना रक्ताची उपलब्धता करून देणारे निशिकांत बडगे, आशिष कसले, विपुल माने या रक्तदूतांचा काँग्रेस नेते अविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनात युवक काँग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला.

खऱ्या अर्थाने रक्ताचे नाते जपण्याचं काम ही सर्व मंडळी करीत असून, या सर्वांमुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले असल्याचा प्रत्यय आला आहे. कार्यक्रमाचे आयोजक प्रदेश युवक काँग्रेस महासचिव सागर कावरे पाटील यांनी कोविड काळातसुद्धा राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असताना अनेक लोकांना रक्तदानाविषयी जागृत करून रक्तदान करण्यासाठी प्रेरणा दिली. यावेळी अविनाश देशमुख, सागर कावरे पाटील, राजीव इटोले, दिनेश लोहोकार, नीलेश चतरकर, अंकुश भेंडेकर, कार्तिक पोदाडे, भूषण चतरकर, नीरज खडसे, धीरज देशमुख, सुजय ढोरे, तुषार गावंडे, वैभव इंगोले उपस्थित होते.

Web Title: Honors of blood angels on behalf of Pradesh Youth Congress