राजनापूर, खिनखिनी येथे वादळामुळे घरांचे नुकसान
By Admin | Updated: May 28, 2017 03:58 IST2017-05-28T03:58:01+5:302017-05-28T03:58:01+5:30
अन्वी मिर्झापूर येथे गारपीट : मूर्तिजापूर तालुक्यात वादळी पाऊस.

राजनापूर, खिनखिनी येथे वादळामुळे घरांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूम : येथून जवळच असलेल्या राजनापूर खिनखिनी येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. अकोला तालुक्यातील अन्वी मिर्झापूर येथे अर्धा तास गारपीट झाली.
राजनापूर खिनखिनी येथे दुपारी अचानक वादळासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे दलित वस्तीतील अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली, तर काहींच्या घरांची पडझड झाली. वादळामुळे गावातील व परिसरातील अनेक झाडे उन्मळून पडली. जामठी ते कुरुम रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने हा रस्ता बंद पडला आहे. वादळाचा वेग एवढा जास्त होता, की ग्रामस्थांच्या घरावरील टिनपत्रे एक किमीपर्यंंंत जाऊन पडले. या वादळामुळे प्रवीण रामराव शेजव, पंजाब सोळंके, बबिता अतभोरे, समाधान हिवराळे, विजय शेजव, सहदेव शेजव, राजू शेजव, समाधान शेजव, अरुणराव साबळे, कपूर पवार, रंजित पवार, नागोराव किर्दक, देवराव शेजव, सचिन कोटांगले, बंडू शेजव, चंदू शेजव, भीमराव शेजव, बाळू किर्दक, मुगुंटराव शेजव, पंकज वाघमारे, कैलास तायडे, रामेशवर वाळदे, गोपाल शेजव, पिंटू शेजव, रामकृष्ण साबळे, जनार्दन शिरभाते आदींसह अनेकांची टिनपत्रे उडाली. अनिल देशमुख, प्रभाकर देशमुख, ज्ञानदेव भांबुलकर, रमेश साबळे आदींसह इतरांच्या घरांची पडझड झाली. नुकसानग्रस्त ग्रामस्थांना मदत देण्याची मागणी होत आहे.