पोलिसास वाचविण्यासाठी होमगार्डचा बळी देण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 01:18 PM2018-12-09T13:18:16+5:302018-12-09T13:18:47+5:30

पोलीस कर्मचाºयास वाचविण्याचा डावच पोलिसांनी आखला असून, त्या जागेवर एका होमगार्डचा बळी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Home guards victim to save police of city kotwali police station akola | पोलिसास वाचविण्यासाठी होमगार्डचा बळी देण्याचा डाव

पोलिसास वाचविण्यासाठी होमगार्डचा बळी देण्याचा डाव

googlenewsNext


अकोला: सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात मोबाइल चोरीच्या संशयावरून कारंजातील एका इसमास बोलावून त्यांच्याकडून १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तिघांमधील भूमिगत असलेल्या पोलीस कर्मचाºयास वाचविण्याचा डावच पोलिसांनी आखला असून, त्या जागेवर एका होमगार्डचा बळी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या लाचखोरीचा मुख्य सूत्रधारच हा तिसरा पोलीस कर्मचारी असल्याची माहिती असून, म्हस्के व शेंडे यांचा नाहकच बळी गेल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी एका इसमास त्यांच्याकडे चोरीचा मोबाइल असल्याच्या कारणावरून अकोल्यात बोलाविण्यात आले होते. त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस उपनिरीक्षक शैलेश सुरेश म्हस्के आणि त्याचा रायटर राजेश शेंडे व तिसरा पोलीस कर्मचारी या तिघांनी त्यांना चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली होती; मात्र तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केल्यानंतर एसीबीच्या अधिकाºयांनी २२ नोव्हेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, शैलेश म्हस्के, राजेश शेंडे व गुन्हे शोध पथकात काम करीत असलेला तिसरा कर्मचारी यांनी लाच मागितल्याचे समोर आले आहे. त्यामुळे म्हस्केसह दोन्ही पोलीस कर्मचाºयांनी तक्रारकर्त्यास बेदम मारहाण करीत, त्याच्याकडील रेकॉर्डर तोडले होते, तर या रेकॉर्डरमधील मेमरी कार्डही पळवून तक्रारकर्त्यास जबरदस्तीने बंदिस्त केले होते. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी म्हस्के आणि शेंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे; मात्र तिसºया पोलीस कर्मचाºयाचे नाव बदलण्याचा डाव आखण्यात आला असून, त्याजागी एका होमगार्डचे नाव समोर करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. म्हस्के आणि शेंडे यांना ही लाच घेण्यासाठी प्रोत्साहन देणारा हा तिसरा पोलीस कर्मचारीच असल्याची चर्चा असून, पोलीस हे नाव दडविण्यामागे नेमके कारण काय, याचीही खमंग चर्चा सुरू आहे.


 ...तर वरिष्ठ अधिकारीही अडचणीत
सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातील सदर होमगार्ड हा वरिष्ठ पोलीस अधिकाºयांसोबत काम करीत असल्याने या होमगार्डचे नाव समोर आल्यास वरिष्ठ पोलीस अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाºयाला वाचविण्याचा डाव अनेकांच्या अंगाशी येण्याची शक्यता असून, सीसी कॅमेºयानंतरही सदर कर्मचाºयाचे नाव १५ दिवसांचा कलावधी उलटल्यावरही समोर न आल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.

 

Web Title: Home guards victim to save police of city kotwali police station akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.