पवित्र रमजानची सुरुवात; आज पहिला रोजा
By Admin | Updated: May 28, 2017 03:53 IST2017-05-28T03:53:12+5:302017-05-28T03:53:12+5:30
चंद्रदर्शनानंतर एकमेकांना तसेच नातेवाइकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.

पवित्र रमजानची सुरुवात; आज पहिला रोजा
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : इस्लामी कॅलेंडरचे अकरा महिने संपल्यानंतर शनिवारी संध्याकाळी पवित्र रमजानचा चंद्र दिसला. चंद्र दिसल्यामुळे शनिवारी रात्री नमाजनंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभकामना दिल्यात.
रमजान महिना हा इस्लामी महिन्यांमध्ये अतिशय पवित्र मानला जातो. चंद्र दर्शनाने या महिन्याची सुरुवात होते. शनिवारी संध्याकाळी ह्यमगरिब ची नमाजह्ण झाल्यानंतर सर्व मुस्लीम बांधवांनी मशीद व घरांच्या छतावर जाऊन चंद्रोदयाची प्रतीक्षा केली. चंद्रदर्शनानंतर एकमेकांना तसेच नातेवाइकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
शनिवारी रात्री उशिरा नियमित ह्यईशाची नमाजह्णनंतर शहरातील सर्व मशिदीमध्ये विशेष नमाजाचे आयोजन केले आहे. रविवारपासून रोजे प्रारंभ होत असल्याने मुस्लीम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पवित्र रमजान महिन्यात भारनियमन करू नये!
मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना २७ मेपासून सुरू झाला असून, या महिन्यात भारनियमन करू नये, असे निवेदन अकोला जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शनिवारी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.या पवित्र महिन्यात मुस्लीम समाजबांधव उपवास ठेवतात. सध्या उन्हाळा आहे. अशातच वीजपुरवठा बंद पडल्यास त्याचा असह्य त्रास होतो, असे मेहबूब खान पठाण, मो. नोमान, सोहीलभाई, वसीम खान, अजहर खान, अमीन खान, शे. इमरान, मो. शारू क, जुबेर खान, रजीक भाई आदींनी निवेदनात नमूद केले आहे.