हातगावात अँपे झाडावर आदळला; दोन ठार

By Admin | Updated: September 3, 2016 02:16 IST2016-09-03T02:16:43+5:302016-09-03T02:16:43+5:30

मूर्तिजापूर तालुक्यातील घटना.

Hippo; Two killed | हातगावात अँपे झाडावर आदळला; दोन ठार

हातगावात अँपे झाडावर आदळला; दोन ठार

मूूर्तिजापूर (जि. अकोला), दि. २: भरधाव अँपे झाडावर आदळून दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. ही घटना मूर्तिजापूर शहरापासून जवळच असलेल्या हातगाव येथे २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान घडली. प्रवासी घेऊन जात असलेला अँपे हातगावजवळ झाडावर आदळल्याने अँपेमधील सुंदरबाई साहेबराव कोकणे आणि पार्वताबाई महादेवराव कोकणे रा. दहातोंडा या दोघी जागीच ठार झाल्या, तर महादेव मोतीराम कोकणे, जयनंदा गोपकर, संघर्ष कोकणे आदी जखमी झाले आहेत.

Web Title: Hippo; Two killed