श्राद्धाचा अवाजवी खर्च टाळत वृद्धाश्रमाला केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:24 IST2021-08-25T04:24:30+5:302021-08-25T04:24:30+5:30

बार्शीटाकळी : येथील प्रतिष्ठित नागरिक स्व. आकारामजी जयरामजी मार्गे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त श्राद्धाच्या अवाजवी खर्चाला फाटा देत मार्गे ...

Helping the old age home by avoiding the unnecessary expenses of Shraddha | श्राद्धाचा अवाजवी खर्च टाळत वृद्धाश्रमाला केली मदत

श्राद्धाचा अवाजवी खर्च टाळत वृद्धाश्रमाला केली मदत

बार्शीटाकळी : येथील प्रतिष्ठित नागरिक स्व. आकारामजी जयरामजी मार्गे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त श्राद्धाच्या अवाजवी खर्चाला फाटा देत मार्गे परिवाराने शिवापूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे तेथील प्रत्येक वृद्धाला जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी, व्यापारी वर्गासह प्रत्येकाचे जनजीवन विस्कळीत झाले. लॉकडाऊनमुळे गावात रोजगारावर परिणाम झाला. तसेच अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशीच स्थिती वृद्धाश्रमात आहे. मदत खऱ्या अर्थाने उपयोगी आणि सार्थक ठरेल या उदात्त हेतूने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत स्व. आकारामजी जयरामजी मार्गे यांच्या परिवराने प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त श्राद्धाच्या अवाजवी खर्चाला फाटा देत वृद्धाश्रमात जाऊन प्रत्येक वृद्धाला मदत केली. यावेळी लीलाबाई आकारामजी मार्गे, हेमंत आकाराम मार्गे, गिरीश लाड यांच्या वतीने स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. शहरात सर्वत्र मार्गे परिवाराच्या सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

जीवनावश्यक साहित्यांचे केले वाटप

शिवापूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे तेथील प्रत्येक वृद्धांना जीवनावश्यक साहित्य ब्लँकेट, खुर्च्या, साळी, लुगडे, टॉवेल तसेच दैनंदिन वापराच्या वस्तू असे एकूण २१ हजार रुपयांच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.

Web Title: Helping the old age home by avoiding the unnecessary expenses of Shraddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.