कुटुंब वित्तसाहाय्य योजनेतून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:27+5:302021-04-21T04:19:27+5:30

भांबेरी आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण भांबेरी : येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात २५ मार्चपासून कोरोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. गावातील ...

Help from the Family Financing Scheme | कुटुंब वित्तसाहाय्य योजनेतून मदत

कुटुंब वित्तसाहाय्य योजनेतून मदत

भांबेरी आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण

भांबेरी : येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात २५ मार्चपासून कोरोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. गावातील ज्येष्ठ नागरिकांसह पुरुष, महिला व व्यावसायिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत २१७ जणांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी डॉ. अनिल मल्ल, सरपंच माधुरी काळे, तलाठी मनवटकर, डॉ. गवई, मानखे, शरद वाघ, उषा तिहले आदी उपस्थित होते.

आगर येथे कोरोना जनजागृती मोहीम

आगर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उरळचे ठाणेदार अनंत वडतकार यांनी मंगळवारी आगर गावासह परिसरात फिरून कोरोनाची जनजागृती केली. कोरोना जनजागृती फलकाचे अनावरण केले. यावेळी ज्ञानेश्वर काळणे, रामदास भिसे, सुनील फुकट, सचिन गायकवाड, देवीदास जगदाळे, श्रीकृष्ण फुकट, गणेश फुकट उपस्थित होते.

बोरगाव मंजू येथे नियमांचा फज्जा

बोरगाव मंजू : गावातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही नागरिक बेफिकीर होत वावरताना दिसत आहेत. गावात मंगळवारी आठवडी बाजार होता. बाजारात या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

सेंट ॲन्स शाळेत पक्ष्यांसाठी पाणपोई

मूर्तिजापूर : येथील सेंट ॲन्स हायस्कूलमध्ये मूर्तिजापूर स्वच्छता अभियानाच्या वतीने पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका सिस्टर रिता, सिस्टर मेघा, शिक्षक ज्ञानेश ताले, ओल्गा मोहोड, अंजली चरडे, वर्षा मेहकरे, राजमनी अय्यर, सिस्टर रोज, पूनम वारे, पूजा ठाकूर, वैशाली गुल्हाने, अनुराधा मानकर आदींची उपस्थिती होती.

‘पोलीस आपल्या दारी’ मोहिमेला प्रतिसाद

बार्शीटाकळी : तालुक्यातील दोनद खु. येथे पिंजर पोलिसांच्या वतीने ‘एक गाव, एक पोलीस’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी पीएसआय विकास राठोड, बिट जमादार महादेव सोळंके यांनी उपक्रमाची माहिती दिली. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्षांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Help from the Family Financing Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.