सहका-यांच्या मदतीने फिर्यादीनेच केला स्वत:ला लुटण्याचा बनाव

By Admin | Updated: October 6, 2014 01:41 IST2014-10-06T01:41:37+5:302014-10-06T01:41:37+5:30

अकोट येथील नोकरांचा बनाव; ८ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी.

With the help of the co-operators, take the plunder and take the plunder | सहका-यांच्या मदतीने फिर्यादीनेच केला स्वत:ला लुटण्याचा बनाव

सहका-यांच्या मदतीने फिर्यादीनेच केला स्वत:ला लुटण्याचा बनाव

अकोला : आकोट येथील व्यापार्‍याने लोखंड खरेदीसाठी दिलेले तीन लाख रुपये पाहून, नोकराची नियत फिरली आणि त्याने दोघा सहकार्‍यांना हाताशी घेऊन स्वत:लाच लुटण्याचा बनाव केल्याची बाब पोलिस तपासातून स्पष्ट झाली. रविवारी कोतवाली पोलिसांनी तिघाही आरोपींना न्यायालयाने ितघांना ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आकोट येथे बोके नामक व्यापार्‍याने त्याच्याकडील नोकर प्रशांत पडाळे (रा. वरूळ जऊळका) याला शनिवारी लोखंड आणण्यासाठी तीन लाख रुपये दिले आणि वडाळी सटवाई येथील मालवाहू गाडीचा चालक स्वप्निल टाले याच्यासोबत अकोल्याला पाठविले. तीन लाख रुपयांची रोकड पाहून प्रशांतची नियत फिरली. त्याने वरूळ जऊळका येथील किशोर दशरथ गवई व कालवाडी येथील सचिन विनोद हिंगणकर यांना सोबत घेऊन संगनमताने स्वत:ला लुटण्याची योजना बनविली. त्यासाठी गवई व हिंगणकर यांना एमएच ३0 एफ ५४१२ क्रमांकाची कार घेऊन अकोल्यात बोलाविले. प्रशांत पडोळे व चालक स्वप्निल टाले हे बीएसएनएल कार्यालयाजवळ असताना, गवई व हिंगणकर यांनी प्रशांत व स्वप्निलला मारहाण करून त्यांच्याकडील तीन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकली आणि पळून गेले. पडोळे याने कोतवाली पोलिस ठाण्यात पोहोचून त्याला लुटल्याची हकीकत सांगितली. लुटणार्‍यांच्या कारचा क्रमांकही सांगितला. पोलिसांनी शोध मोहीम राबवून होमगार्डजवळ कार अडवून आरोपी गवई व हिंगणकर यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी फिर्यादी पडोळेचेही नाव सांगितल्यावर पूर्ण चित्रच स्पष्ट झाले. पडोळे यानेही संगनमताने हा बनाव केल्याची माहिती दिल्याने, पोलिसांनी फिर्यादीलाही आरोपी बनविले.

Web Title: With the help of the co-operators, take the plunder and take the plunder