शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अकोला जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; २८ मंडळांमध्ये संततधार; ४७ घरांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 5:56 PM

अकोला : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील २८ मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला असून, हजारो हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत.

ठळक मुद्दे पुलावरून पाणी असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून, अतिवृष्टीमुळे ४७ घरांचे नुकसान झाले आहे. बोरगाव वैराळे, आगर, दुधाळा, सांगवी बाजार व सांगवी बु. या गावांचा संपर्क तुटला आहे.संततधार पावसामुळे जिल्ह्यातील मोर्णा, काटेपूर्णा, पूर्णा, कमळगंगा, उमा या नद्यांना पूर आला आहे.

अकोला : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील २८ मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला असून, हजारो हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. पुलावरून पाणी असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून, अतिवृष्टीमुळे ४७ घरांचे नुकसान झाले आहे.महिनाभराच्या खंडानंतर जिल्ह्यात १६ ते १७ आॅगस्ट दरम्यान अकोला तालुक्यातील कापशी मंडळात १०९, सांगळुद ११०, शिवणी १०२, बोरगाव मंजू १०५, पळसो १०५, कुरणखेड १२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. बार्शीटाकळी तालुक्यात बार्शीटाकळी मंडळात १९४ मिमी, राजंदा १८०, महान १४०, पिंजर १४५, धाबा १५२, खेर्डा बु. १४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तेल्हारा तालुक्यात पाथर्डी मंडळात ६८ मिमी, बाळापूर तालुक्यात निंबा मंडळात ११९, पारस मंडळात ७०, व्याळा ६६, पातूर तालुक्यात पातूर मंडळ १०८, आलेगाव ११३, बाभूळगाव ९१, चान्नी ९०, सस्ती ११४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मूर्तिजापूर मंडळात १२२, माना ८५, कुरूम ९०, निंभा १४०, लाखपुरी ८९, हातगाव ८५, शेलू बाजार ८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

अकोला तालुक्यात सर्वाधिक घरांचे नुकसानसंततधार पावसामुळे अकोला तालुक्यातील ३० घरांचे नुकसान झाले आहे, तर बार्शीटाकळीत एक, तेल्हाऱ्यात एक, बाळापुरात तीन आणि मूर्तिजापुरात १२ घरांचे नुकसान झाले आहे. मूर्तिजापूर तालुक्यात तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे.या नद्यांना आला पूरसंततधार पावसामुळे जिल्ह्यातील मोर्णा, काटेपूर्णा, पूर्णा, कमळगंगा, उमा या नद्यांना पूर आला आहे. या नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने हजारो हेक्टवरील पिके पाण्यात गेली आहेत.या गावांचा तुटला संपर्क!नद्यांना पूर येऊन पुलावरून पाणी असल्याने जिल्ह्यातील बोरगाव वैराळे, आगर, दुधाळा, सांगवी बाजार व सांगवी बु. या गावांचा संपर्क तुटला आहे.मूर्तिजापूर-म्हैसांग-अकोला मार्ग व मूर्तिजापूर दहीगाव अकोला मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अकोला-हातरुण-बोरगाव वैराळे रस्त्यावर मोर्णा नदीच्या पुलावर पुराचे पाणी आल्याने बोरगाव वैराळे गावाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. अकोला ते आगर मार्गही बंद होता.

 

टॅग्स :Akolaअकोलाmonsoon 2018मान्सून 2018floodपूर