विठ्ठल महाराज साबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST2021-05-07T04:19:29+5:302021-05-07T04:19:29+5:30

श्रीधर महाराज अवारे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे होते. त्यानंतर ...

A heartfelt tribute to Vitthal Maharaj Sable | विठ्ठल महाराज साबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

विठ्ठल महाराज साबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

श्रीधर महाराज अवारे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे होते. त्यानंतर सुभाष महाराज काळे यांनी महाराजांसोबतच अनुभव श्रद्धांजलीपर भाषणामध्ये सांगितले. याप्रसंगी अरुण महाराज बुरघाटे, श्रीधर महाराज पातोंड, कोंडीराम महाराज नागरगोजे, एकनाथ महाराज पवार, चंद्रशेखर महाराज दाभाडे, सोपान महाराज काळुसे, गजानन महाराज ऐरोकार, सोपान महाराज शेलार, प्रकाश महाराज पांडे यांचे श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी काशिनाथ महाराज आंधळे, जनार्दन महाराज वाळके, निखिल महाराज गोबरे, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, वैभव महाराज अस्वार,गोपाल महाराज नारे,दत्ता पाटील ओळंबे, रमेश पाटील खीरकर, श्रीधर महाराज तळोकार, संतोष महाराज घुगे, वैभव नायसे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन रतन महाराज वसू व योगेश्वर संस्थानचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी केले.

फोटो : मेल फोटोत

साबळे महाराजांच्या स्मरणार्थ रूग्णवाहिका

विठ्ठल महाराज साबळे महाराजांचे कार्य प्रत्येकाच्या स्मरणात राहावे. यासाठी विकास निधीमधून विठ्ठल महाराज साबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वारकरी रुग्णवाहिका देण्याचे अभिवचन आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी दिले. यावेळी महाराजांच्या आठवणी सांगताना, सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी साबळे महाराज यांच्या कुटुंबाला २१ हजार रुपयांची मदत जाहीर केली.

Web Title: A heartfelt tribute to Vitthal Maharaj Sable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.