क्षारयुक्त पाण्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: June 4, 2014 22:03 IST2014-06-04T19:12:30+5:302014-06-04T22:03:22+5:30
अकोट ग्रामीण भागात उन्हाळय़ात ८४ खेडी पाणीपुरवठ्याचे पाणी केवळ तीनच दिवस;क्षारयुक्त पाण्याने आरोग्य धोक्यात

क्षारयुक्त पाण्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
रोहणखेड : येथे उन्हाळा लागल्यापूर्वीच पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. परिणामी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात नागरिकांना ८४ खेडी पाणीपुरवठ्याचे पाणी केवळ तीनच दिवस तेही अपुरे मिळाले आहे. त्यामुळे नागरिक हापसीच्या क्षारयुक्त पाण्यावर तहान भागवित आहेत. या पाण्यामुळे ग्रामस्थांना पोटाचे आहार जडले आहेत. मात्र गावात एवढी भीषण पाणीटंचाई असूनही लोकप्रतिनिधी कुंभकर्णाच्या झोपेत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाद्वारे मात्र कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार सुरू आहे. येथील पाणीटंचाईसाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. उन्हाळा संपत आला; परंतु अद्याप निधी मात्र मिळालाच नाही. पावसाळ्यातही ग्रामस्थांना पाण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे अनेकांना विविध प्रकारचे आजार जडले आहेत; परंतु आरोग्याविषयी मार्गदर्शन करणारे आरोग्यसेवकदेखील गावात येत नाहीत. त्यामुळे हापशीच्या पाण्याचे नमुने कोण घेणार, प्राथमिक उपचार कोण करणार, आरोग्यविषयक जनजागृतीवर माहिती कोण देणार, आदी प्रश्न निर्माण झाले आहेत.