फेरीवाला धोरण; ५ ऑगस्टला अकोला मनपाची बैठक
By Admin | Updated: August 1, 2014 02:23 IST2014-08-01T01:40:18+5:302014-08-01T02:23:18+5:30
अतिक्रमित व्यावसायिकांचा तिढा मार्गी लागण्याची अपेक्षा.

फेरीवाला धोरण; ५ ऑगस्टला अकोला मनपाची बैठक
अकोला : शहरात रस्त्यालगत व्यवसाय थाटणार्या अतिक्रमित लघू व्यावसायिक-फेरीवाल्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ह्यराष्ट्रीय फेरीवाला धोरणह्ण लागू करणे मनपाला बंधनकारक आहे. मनपाने अतिक्रमणाच्या सबबीखाली लघू व्यावसायिकांची हकालपट्टी केल्यावर फेरीवाला धोरण लागू करणे क्रमप्राप्त होते. या मुद्यावर ह्यलोकमतह्णने प्रकाशझोत टाकल्यानंतर प्रशासनाने येत्या ५ ऑगस्ट रोजी फेरीवाला धोरणावर बैठक आयोजित केल्याची माहिती आहे.
महापालिका प्रशासनाने मागील दोन महिन्यांपासून मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली आहे. शहराच्या गल्लीबोळात, मोठे नाले यांवर अ ितक्रमकांनी दुकाने थाटली आहेत. प्रशासनाने बहुतांश अतिक्रमकांची हकालपट्टी केली. यामध्ये संबंधित लघू व्यावसायिकांची उपासमार होत असल्यामुळे प्रशासनाने पर्यायी जागा देण्याची मागणी केली आहे. यादरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यालगत व्यवसाय करणार्या लघू व्यावसायिक-फेरीवाल्यांसाठी फेब्रुवारी २0१४ मध्ये नवीन नियमावली जारी केली. त्यामध्ये संबंधित मनपा प्रशासनाने समितीचे गठन करून फेरीवाल्यांसाठी उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. या ठिकाणी मात्र लघू व्यावसायिक-फेरीवाल्यांना हुसकावून लावल्यानंतर प्रशासनाने ह्यराष्ट्रीय फेरीवाला धोरणह्णनुसार अद्यापि कोणतीही तयारी केली नसल्याचे चित्र आहे.
या मुद्यावर ह्यलोकमतह्णने प्रकाशझोत टाकल्यानंतर प्रशासनाने फेरीवाला धोरणावर येत्या ५ ऑगस्ट रोजी बैठक आयोजित केल्याची माहिती आहे. या बैठकीत लघू व्यावसायिकांचा तिढा मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
*कोण असेल समितीमध्ये?
मनपा अंतर्गत स्थापन होणार्या फेरीवाला समितीमध्ये अध्यक्षपदी आयुक्त किंवा आयुक्तांनी निर्देशित केलेले वरिष्ठ अधिकारी, सदस्य म्हणून नगर रचनाचे सहायक नगर रचनाकार, मुख्य वैद्यकीय अधिकारी, संबंधित भागाचे पोलिस निरीक्षक, वाहतूक पोलिस निरीक्षक, फेरीवाला संघटनेचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी, व्यापार व वाणिज्य समूहाचे प्रतिनिधी, शेड्युल्ड बँकेचे प्रतिनिधी आदींचा समावेश राहील.