अकोल्यातील तपे हनुमान मंदिर परिसरात सिलिंडर लिकेजमुळे आग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 19:24 IST2018-01-21T19:24:40+5:302018-01-21T19:24:53+5:30
अकोला : तपे हनुमान मंदिर परिसरातील मरगट येथील रहिवासी असलेल्या एका इसमाच्या घरात सिलिंडर लिकेज झाल्यामुळे आग लागल्याची घटना रविवारी पहाटे घडली. मात्र, यामध्ये कोणतीही हानी झाली नाही.

अकोल्यातील तपे हनुमान मंदिर परिसरात सिलिंडर लिकेजमुळे आग!
ठळक मुद्देपरिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेऊन आग आटोक्यात आणली
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : तपे हनुमान मंदिर परिसरातील मरगट येथील रहिवासी असलेल्या एका इसमाच्या घरात सिलिंडर लिकेज झाल्यामुळे आग लागल्याची घटना रविवारी पहाटे घडली. मात्र, यामध्ये कोणतीही हानी झाली नाही.
मरगट परिसरातील एका घरातील गॅस सिलिंडर लिकेज असताना येथील महिलेने या सिलिंडरवरून गॅस सुरू केला. मात्र, सिलिंडरच्या नळीजवळ लिकेज असल्यामुळे सिलिंडरने पेट घेतला. महिलेने सिलिंडरचा कॉक बंद करण्याच्या आतच घरातील साहित्याला किरकोळ आग लागली. मात्र, परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.