शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग गिर्यारोहक धीरजची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मधे नोंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 16:38 IST

आकोट :  एक हात व पायाने दिव्यांग असलेला अकोला जिल्ह्यातील आकोट येथील धीरज कळसाईत या पहिल्या भारतीय दिव्यांगाने साऊथ ऑफ्रीकेतील माऊंट किलीमंजारो हे शिखर सर करुन भारताचा राष्ट्रध्वज फडकावल्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली आहे.

- विजय शिंदे

आकोट :  एक हात व पायाने दिव्यांग असलेला अकोला जिल्ह्यातील आकोट येथील धीरज कळसाईत या पहिल्या भारतीय दिव्यांगाने साऊथ ऑफ्रीकेतील माऊंट किलीमंजारो हे शिखर सर करुन भारताचा राष्ट्रध्वज फडकावल्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली आहे. याबद्दल धीरज कळसाईतला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने मेडल, प्रशस्तीपत्र व इतर साहित्य देऊन त्याचा गौरव केला आहे. त्याच्या कामगिरीची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेतल्या गेल्याने महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब ठरली असून आकोट शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.  विशेष म्हणजे किलीमंजारो शिखर सर करण्याकरिता परिस्थितीने हतबल असलेल्या धीरजची साहसकथा मतदतीचा हात या सदराखाली प्रसिध्द केली होती. त्यानंतर अनेक मदतीचे हात त्याला बळकटी देण्याकरिता पुढे आले होते. किलो मंजारो हा आफ्रीका खंडातील सर्वात उंच पर्वत टांन्झानिया देशातील इशान्य भागात केनियाच्या सिमेवर असलेल्या या शिखराची उंची 19 हजार 341 फुट  आहे. विशेष म्हणजे पर्वतरांगेचा भाग नसलेला हा जगातील सर्वात उंच पर्वत असून बहुतांश भाग बर्फाळ असल्याने हिमख्लन होत असते. तसेच या पर्वताची सरळ उभी असल्याने  वातावरणातील तापमान व जोराने वाहणारे वारे याचा सामना करीत धीरज कळसाईतने हे शिखर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी पहाटे सर केला. शिखरावर पोहचल्यानंतर अवघ्या 10 ते 15 मिनीटात पूर्वतयारीनिशी गेलेल्या धीरजने भारत माता की जय, जय महाराष्ट्र , जय जिजाऊ, जय शिवाजी, जय भवानीच्या जयघोषात   प्रजासत्ताक दिनी पहाटे भारताचा तिरंगा फडकविला. सोबतच महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असलेला भगवा ध्वज फडकविला. त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन केले. धीरज शारिरीकदृष्ट्या दिव्यांग असला तरी आपल्या साहसीवृत्ती व हिमतीने किली मंजारो हे हिमशिखर सर केले.  धीरज ने यापुर्वी कळसुबाई शिखर, लिंगाणा, पावन खिंड, तुंगागड, त्रिकोणा गड, सुधागड, वजीर सुळका अशा शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. धिरज कळसाईतच्या कुटूंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असुन आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. वडील मजूरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवितात. धिरजने मुक्त विद्यापीठातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आधीच जन्मापासून डावा हात मनगटापासून नसल्याने त्याचा जीवन जगण्याचा संघर्ष असतांनाच काही वर्षांपासून अपघातात त्याला आपला एक पाय गमवावा लागला होता. शरिरात दिव्यांग आले असले तरी मात्र त्याने आत्मविश्वासाच्या भरवशावर गिर्यारोहणासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात उंच भरारी घेतली असून त्याचे जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द मनाशी बाळगुण आहे. नुकतीच त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने नोंद घेतल्याबद्दल त्याचे कौतूक होत आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होण्याकरिता धिरजला विनोद हरिभाऊ सुरडकर, बधिरीकरण शास्त्र तज्ञ डॉ.राजेंद्र सोनोने, बालरोग तज्ञ डॉ.अंजली सोनोने यांनी त्याला मार्गदर्शन केले.   

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोट