वातावरणातील गारठा वाढला

By Admin | Updated: December 28, 2014 00:57 IST2014-12-28T00:57:38+5:302014-12-28T00:57:38+5:30

सर्दीसह विविध आजारांमध्ये वाढ.

The hail of the atmosphere increased | वातावरणातील गारठा वाढला

वातावरणातील गारठा वाढला

अकोला: गत दोन दिवसांपासून वातावरणातील गारवा पुन्हा वाढला आहे. गत पंधरा दिवसांपासून तापमानात घट झाली असून, थंडीचा जोर वाढला आहे. गेल्या आठवड्यात तापमान कमी होवून थंडीची हुडहुडी चांगलीच वाढली होती. दरम्यान चार दिवसांपूर्वी तापमानात वाढ झाल्याने थंडी ओसरल्याचे जाणवत होते. मात्र, गुरूवारी रात्रीपासून पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे वातावरणातील गारठा वाढल्याचे जाणवत आहे. थंडीचा जोर वाढल्याच्या पृष्ठभूमीवर गावा गावात शेकोट्या पेटविण्यात येत असून, थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून स्वेटर, मफलर, जर्कींग व इतर प्रकारच्या उबदार कपड्यांचा वापर करण्यात येत आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत थंडीचा जोर कायम असतो. त्यामुळे वातावरणातील गारठा वाढल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. त्यानुषंगाने थंडीपासून बचावासाठी लागणार्‍या कपड्यांची दुकाने शहरात विविध ठिकाणी थाटली आहेत. उबदार कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

Web Title: The hail of the atmosphere increased