दोन ठिकाणावरून गुटख्याचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST2021-06-29T04:14:21+5:302021-06-29T04:14:21+5:30

जुना भाजीबाजार परिसरात जय प्रेमकुमार नाथानी हा त्याच्या मालकीच्या गोदामातून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस ...

Gutkha stocks seized from two places | दोन ठिकाणावरून गुटख्याचा साठा जप्त

दोन ठिकाणावरून गुटख्याचा साठा जप्त

जुना भाजीबाजार परिसरात जय प्रेमकुमार नाथानी हा त्याच्या मालकीच्या गोदामातून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर बाळापूर तालुक्यातील बार्लिंगा येथील जिल्हा परिषद शाळेसमोर प्रतिबंधित गुटख्याची विक्री रमेश तुळशीराम मानकर हा करीत होता. या माहितीवरून मानकर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Gutkha stocks seized from two places