बोरगाव मंजू परिसरातून गुटख्याचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST2021-02-05T06:17:12+5:302021-02-05T06:17:12+5:30

दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास रमेश पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार म्हैसांग व रामगाव या परिसरातून गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक व विक्री ...

Gutkha stocks seized from Borgaon Manju area | बोरगाव मंजू परिसरातून गुटख्याचा साठा जप्त

बोरगाव मंजू परिसरातून गुटख्याचा साठा जप्त

दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास रमेश पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार म्हैसांग व रामगाव या परिसरातून गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक व विक्री करण्यात येत आहे. या माहितीवरून त्यांनी या परिसरात सापळा रचून मोटारसायकलवर गुटख्याची वाहतूक करणाऱ्या सय्यद राशिद अली सय्यद अखिल, वय २५ वर्षे, रा. बोरगाव मंजू व नंदकिशोर बाळकृष्ण माहुलकर वय ४० वर्षे, रा. रुस्तमपूर येवदा यांना ताब्यात घेतले. या दोघांकडून प्रतिबंधित असलेला गुटखा वाह, काळी बहार, नजर, पान बहार, अशा विविध कंपन्यांचा सुगंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त केला. वाहतूक उपयोगासाठी असलेली मोटारसायकल असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अकोला जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी कक्षचे प्रमुख विलास रमेश पाटील यांनी व त्यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Gutkha stocks seized from Borgaon Manju area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.