शिवर, शिवणी येथून गुटख्याचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:14 IST2021-06-26T04:14:29+5:302021-06-26T04:14:29+5:30

शिवर येथील रहिवासी प्रकाश सुखदेव दारोकार (४५) रा. ढोणे कॉलनी हा त्याच्या राहत्या घरातून गुटख्याची अवैधरित्या विक्री करीत असल्याच्या ...

Gutkha stock seized from Shivar, Shivani | शिवर, शिवणी येथून गुटख्याचा साठा जप्त

शिवर, शिवणी येथून गुटख्याचा साठा जप्त

शिवर येथील रहिवासी प्रकाश सुखदेव दारोकार (४५) रा. ढोणे कॉलनी हा त्याच्या राहत्या घरातून गुटख्याची अवैधरित्या विक्री करीत असल्याच्या माहितीवरून विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी पथकासह छापा टाकला. त्याच्या घरातून गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर शिवणी येथील रहिवासी खालील खान अब्दुल्ला खान (६४) याच्या घरात छापा टाकून त्याच्या घरातून ५० हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. विशेष पथकाने दोन ठिकाणी छापे टाकून सुमारे १ लाख रुपयांपेक्षा अधिक गुटखा जप्त केला आहे. या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Gutkha stock seized from Shivar, Shivani