मेडशी परिसरातून पाच लाखांचा गुटखा जप्त
By Admin | Updated: December 28, 2014 01:08 IST2014-12-28T01:08:29+5:302014-12-28T01:08:29+5:30
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; लखन खंडेलवाल व आशीष काबरा अटकेत; दोन फरार.

मेडशी परिसरातून पाच लाखांचा गुटखा जप्त
अकोला : वाशिम जिल्ह्यातून मेडशी व पातूरच्या घाटातून चोरट्या मार्गाने अकोल्यात येत असलेला पाच लाखांचा गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी छापेमारी करीत पकडला. मेडशी परिसरातील जय हनुमान ढाब्यानजीक असलेल्या एका गोदामातून हा गुटखा जप्त करण्यात आला तसेच दोन गुटखा माफियांना अटक करण्यात आली. दोघे फरार होण्यात यशस्वी झाले असून, त्यांच्यावर मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्यात गुटखाविक्री जोमात सुरू असून, त्याचा बाजार पुन्हा फोफावला असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने शनिवारी प्रकाशित करताच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी शनिवारी मालेगाव व मेडशी परिसरातील गोदामांवर छापेमारी करीत हनुमान ढाब्यानजीक असलेल्या एका गोदामातून पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. गुटखा माफिया लखन खंडेलवाल (रा. मेडशी) व आशीष काबरा (रा. अकोला) या दोघांचा हा माल असून, त्यांच्याविरुद्ध मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी गोदामांसोबतच ट्रक, खासगी बस आणि एसटी बसची तपासणी केल्यानंतर एका गोदामातून पाच लाख रुपयांचा हा गुटखा जप्त करण्यात यश मिळवले.
हनुमान ढाब्यानजीक असलेल्या या गोदामात रात्रीच्या अंधारात दिवसाआड ट्रकने गुटखा साठविण्यात येत असल्याची माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त एस. एम. कोलते यांनी आपल्या अधिकार्यांना कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले हो्रते. यावरून इतर तपासण्या मागे ठेवून गुटख्याची शोधमोहीम अधिकार्यांनी राबविली असून, पहिल्याच दिवशी एका गोदामातून पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सुगंधी सुपारी, विमल पान मसाला, विमल गुटखा, पानबहार गुटखा व पान मसाला जप्त करण्यात आला.