मुंडगाव येथून दोन लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST2021-02-05T06:17:41+5:302021-02-05T06:17:41+5:30
दहशतवादविरोधी पथकाची कारवाई अकोला : अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मुंडगाव येथे एका किराणा दुकानातून मोठ्या प्रमाणात ...

मुंडगाव येथून दोन लाखांचा गुटखा जप्त
दहशतवादविरोधी पथकाची कारवाई
अकोला : अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मुंडगाव येथे एका किराणा दुकानातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी सोमवारी छापा टाकून दोन लाख रुपयांचा गुटखासाठा जप्त केला. या ठिकाणावरून एकास ताब्यात घेण्यात आले आहे. मुंडगाव येथील रहिवासी परमानंद गजानन आंबडकर यांच्या मालकीच्या सर्वज्ञ किराणा दुकानातून गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाला मिळाली. या माहितीवरून दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी सापळा रचून सोमवारी छापा टाकला. त्यानंतर, या दुकानातून दोन लाख रुपयांचा गुटखासाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये विमाल आणि बहार, नीली बहार, नजर तसेच विविध कंपन्यांचा मोठा साठा आहे. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुटखा अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.