१६.४० लाखांचा गुटखा जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:33 IST2017-07-22T01:33:22+5:302017-07-22T01:33:22+5:30

मूर्तिजापूर : येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावरील कारंजा टी-पॉइंटवर कारंजाकडे जात असलेला १६ लाख ४० हजार रुपयांचा गुटखा मूर्तिजापूर शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री जप्त केला.

Gutka of 16.40 lakhs seized! | १६.४० लाखांचा गुटखा जप्त!

१६.४० लाखांचा गुटखा जप्त!

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावरील कारंजा टी-पॉइंटवर कारंजाकडे जात असलेला १६ लाख ४० हजार रुपयांचा गुटखा मूर्तिजापूर शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
अमरावतीवरून भातकुली मार्गे कारंजाकडे महिंद्रा बोलेरो पिकअप व्हॅन क्र. एमएच ३० एबी २९५१ मध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मूर्तिजापूर शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हे वाहन कारंजा टी पॉइंटवर अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याचे पोते आढळून आले. पोलिसांनी गुटख्यासह वाहन जप्त केले, तसेच जमील खान (४०) रा. कारंजा, मुमताज अफसरखा (३०), मो. जुनैद वसीमोद्दीन (२८) रा. अमरावती यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन पडघन, उपनिरीक्षक गणेश कोथळकर, मोहोड, भारसाकळे, शेगोकार, मगर, जिलानी यांनी केली. पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन पडघन करीत आहेत.

Web Title: Gutka of 16.40 lakhs seized!