विझोरा येथे जुगारावर छापा, १0 जणांना अटक

By Admin | Updated: January 28, 2015 01:02 IST2015-01-28T01:02:03+5:302015-01-28T01:02:03+5:30

तीन शिक्षकांचा समावेश; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त.

Gurgaon raid on Vizhara, 10 people arrested | विझोरा येथे जुगारावर छापा, १0 जणांना अटक

विझोरा येथे जुगारावर छापा, १0 जणांना अटक

विझोरा (बार्शिटाकळी, जि. अकोला): पोलीस अधीक्षकांच्या विशेष भरारी पथकाने २६ जानेवारीच्या सायंकाळी, एका स्थानिक महाविद्यालयानजीक असलेल्या एका घरावर धाड घालून, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांसह एकूण दहा जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास, येथील एका कनिष्ठ महाविद्यालयातील काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इतर काही जणांसोबत, महाविद्यालयानजीकच असलेल्या एका घरात जुगार खेळत होते. पोलिसांना ही माहिती मिळाल्यावरून, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने, छापा घातला आणि एकूण दहा जणांना रंगेहाथ पकडले.
त्यांच्याकडून रोख १४,४८0 रुपये, तसेच ३0 हजार रुपये किमतीचे नऊ मोबाइल संच, तसेच तीन लाख रुपये किमतीची दोन चारचाकी वाहने, असा एकूण तीन लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बाश्रीटाकळी पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्याच्या कलम १२ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Gurgaon raid on Vizhara, 10 people arrested