पालकमंत्र्यांनी केली सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व निर्माणाधिन कामांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 17:05 IST2021-01-05T17:05:13+5:302021-01-05T17:05:40+5:30

Bacchu Kadu News निर्माणाधीन इमारतींची कामे मुदतीच्या आत तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश बच्चू कडू यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

Guardian Minister inspected the work of Super Specialty Hospital and under construction | पालकमंत्र्यांनी केली सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व निर्माणाधिन कामांची पाहणी

पालकमंत्र्यांनी केली सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व निर्माणाधिन कामांची पाहणी

अकोला : जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले पालकमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी सुपर स्पेशलिटी हॉस्पीटल, सामाजिक न्याय भवन, पोलिस वसाहत, पोलिस आयुक्तालय व सांस्कृतिक भवनास भेट देऊन बांधकामाची पाहणी केली. निर्माणाधीन इमारतींची कामे मुदतीच्या आत तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश बच्चू कडू यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

यावेळी विधान परिषदेचे आमदार रणजित पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, मनपाचे आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ए.ए.गणोरकर, आदि अधिकारी उपस्थित होते.

सुपर स्पेशलिटी हॉस्पीटला भेट देवून हॉस्पीटलचे बांधकाम व वैद्यकीय यंत्रसामुग्रीचे पाहणी केली. इमारतीचे उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा व उपचाराकरीता आवश्यक यंत्राची स्थापना करुन सामान्य नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सुविधेचा लाभ लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश ना. बच्चू कडू यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेत. जिल्ह्यातील व बाहेरुन येणाऱ्या नागरिकांना उपाचाऱ्याकरीता सुपर स्पेशलिटी हॉस्पीटलचा मोठया प्रमाणात लाभ होणार असून दुर्धर व मोठे आजाराचे उपचार करणे सोईचे होणार आहे.

पोलिस वसाहत व पोलिस आयुक्तालयाचे निर्माणधीन बांधकामाची पाहणी करुन पोलिस कर्मचाऱ्यांना निवारा मिळणार असल्याचे समाधान व्यक्त केले. तसेच सामाजिक न्याय भवनाचे कामाची पाहणी करुन विहित मुदतीच्या आत व दर्जेदार भवनाचे निर्माण कार्य पुर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेत.तर जिल्ह्यातील सांस्कृतिक भवनाचे उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक तो निधी प्राधान्याने उपलब्ध करुन दयावे,असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Web Title: Guardian Minister inspected the work of Super Specialty Hospital and under construction